कोलाम, दि. १७ : २००८ साली बंगलोर शहरात झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आज पीडीपी नेता अब्दुल नासेर मदानी याला अटक केली आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून मदानीच्या अटकेवरून जो गोंेधळ सुरू होता, त्यावर आज पडदा पडला आहे.
पीडीपी नेता मदानीने आपण स्थानिक न्यायालयात शरणागती पत्करीत आहोत, असे सांगितल्यानंतर थोड्याच वेळात बंगलोर शहराचे पोलिस उपायुक्त ओंमकारय्या यांनी केरळ पोलिसांच्या मदतीने मदानीवर अटक वॉरंट बजावले.
अन्वरासेरी कॅम्पमधे आज दुपारचा नमाज पढल्यानंतर एका वाहनामधून मदानी बाहेर आले. बाहेर येताच केरळ पोलिसांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला व कर्नाटक पोलिसांना अटकेची कारवाई पार पाडू दिली. यानंतर पोलिसांनी मदानी यांच्या गाडीचा ताबा घेतला व गाडीत असलेल्या मदानी यांच्या पत्नी आणि सहायकाशिवाय इतर सर्वांना गाडीतून बाहेर काढले. कोलामचे पोलिस अधिकारी हरशिता अत्ताल्लुरी यांच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना त्यांनी सांगितले की कर्नाटक पोलिसांनी मदानीला अटक केली आहे.
मदानी यांना अटक झाली त्यावेळी कोणीही अटक कारवाईला विरोध केला नाही. मात्र मदानीसमर्थक यावेळी घोषणा करीत होते. अटकेनंतर मदानी यांना विमानाने बंगलोरला नेण्यात आले.
Wednesday, 18 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment