आण्विक आणीबीणी घोषित
टोकियो, दि. १२ : जपानमध्ये मयागी शहराजवळ शुक्रवारी झालेला ८.९ रिश्टरचा भूकंप आणि सुनामी यामुळे तेथील अणुऊर्जा निर्मिती केंद्रांना धोका निर्माण झाला आहे. महाभयंकर संकटाने हादरलेल्या ङ्गुकूशिमा येथील एका अणुऊर्जा केंद्रात स्ङ्गोट झाल्यामुळे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जपान सरकारने आण्विक आणीबाणी घोषित केली आहे.
स्ङ्गोटामुळे अणुऊर्जा केंद्रातून किरणोत्सर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे वीस किलोमीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून सुरक्षा मुखवटे घालूनच लोकांनी अत्यंत गरज असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. तसेच हा किरणोत्सर्ग मानवी शरीरावर फार मोठा परिणाम करणारा नसल्याचे सांगितले जात असले तरी लोक मात्र त्यासंदर्भात कमालीचे दक्ष झाले आहेत. यासंदर्भात प्रामुख्याने अमेरिकेने जपानला सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. शिवाय भारतानेही जपानला मोठ्या प्रमाणावर मदतीची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी सारी सज्जता करून ठेवण्यात आली आहे.
शुक्रवारच्या नैसर्गिक आपत्तीनंतर ङ्गुकूशिमा येथील अणुऊर्जा केंद्रातून मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग सुरू झाला होता. त्यामुळे अणुऊर्जा केंद्रात दूर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत होती. अखेर शनिवारी ही भीती खरी ठरली. स्ङ्गोटानंतर अणुऊर्जा केंद्रातून धूर येत असून वीजपुरवठा खंडित झाला आहे, असे जपानी वृत्तवाहिन्यांनी सांगितले.
याआधी शुक्रवारी जपानच्या पूर्व किनारपट्टीला भूकंप आणि त्सुनामीचा ङ्गटका बसल्यानंतर ङ्गुकूशिमातील प्रकल्पासह देशातील पाच अणुऊर्जा केंद्रांमध्ये काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते.
Sunday, 13 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment