Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 13 March 2011

पणजी महापालिकेसाठी आज मतदान

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ८०० पोलिसांची फौज तैनात
९ दुरंगी, १३ तिरंगी, ६ चौरंगी, १ पंचरंगी व १ षट्कोनी लढत
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) : राज्यातील एकमेव पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी उद्या १३ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण ९२ उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात पुरस्कृत ‘पणजी विकास आघाडी’ व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखालील ‘पणजी फर्स्ट’ या पॅनल्समध्ये होणार आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत ‘टूगेदर फॉर पणजी’ व इतर अपक्ष उमेदवारांनीही आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. एकूण ३० प्रभागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत ९ प्रभागांत दुरंगी, १३ प्रभागांत तिरंगी, ६ प्रभागांत चौरंगी, १ पंचरंगी व एका प्रभागात सहा उमेदवार एकमेकांविरोधात रिंगणात उभे ठाकले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक निर्भय व मोकळ्या वातावरणात पार पडावी यासाठी पूर्णपणे सज्जता ठेवली आहे. एकूण ३२,०९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी ६८ मतदानकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. मतदानादिवशीची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता १४ रोजी सकाळी १० वाजता फार्मसी कॉलेजमध्ये मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी दिली.
मतदानावर नजर ठेवण्यासाठी ११ क्षेत्रीय दंडाधिकार्‍यांसोबत ८ निरीक्षक नेमण्यात आले आहेत. ‘पोल मॉनिटरिंग सिस्टीम’ च्या साहाय्याने संपूर्ण मतदान प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याने बोगस मतदानाला अजिबात वाव नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. अपंग मतदारांसाठी मतदानकेंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्यासाठी ‘व्हीलचेअर’ची सोय करण्यात आली आहे. ९ ठिकाणी दुरंगी, १३ ठिकाणी तिरंगी, ६ ठिकाणी चौरंगी, १ ठिकाणी पंचरंगी व १ जागी षटकोनी लढत रंगणार आहे. प्रभाग ४ ः प्रभाकर डोंगरीकर व कॅरोलिना पो, प्रभाग ५ ः शीतल नाईक व शुभदा शिरगावकर, प्रभाग ७ ः मारिया आल्मेदा व श्‍वेता लोटलीकर, प्रभाग १२ ः प्रसाद आमोणकर व वैदही नाईक, प्रभाग १५ ः शेखर डेगवेकर व मंगलदास नाईक, प्रभाग २२ ः हेमा चोपडेकर व माया तळकर, प्रभाग २५ ः शुभदा धोंड व नमिता नार्वेकर, प्रभाग २७ ः शुभा चोडणकर व सूरज कांदोळकर, प्रभाग २८ ः निवेदिता नाईक चोपडेकर व सुजाता हळदणकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
तिरंगी लढत : प्रभाग १ ः एना रोझा लोबो डिसोझा, नॅटी पो व किरण जांबावलीकर, प्रभाग ६ ः आलेक्स फेलिझादो, बेंटो सिल्वेस्टर व अनंत शेणई गायतोंडे, प्रभाग ८ ः तुकाराम चिन्नावर, दुर्गा केळुस्कर व टोनी रॉड्रिगीस, प्रभाग ९ ः सुरेंद्र फुर्तादो, सुदिन कामत व डॉम्निक रॉड्रिगीस, प्रभाग १० ः रूथ फुर्तादो, माया जोशी व तोषा खुराडे, प्रभाग ११ ः मनोज पाटील, मखिजा कबीर पिंटो व ऍश्‍ली रुझारियो, प्रभाग १३ ः भारती होबळे, मंंगला कारापूरकर व सीमा पेडणेकर, प्रभाग १९ ः अशोक नाईक, यतीन पारेख व प्रसाद सुर्लकर, प्रभाग १६ ः पास्कोल मास्कारेन्हस, सतीशा शिरोडकर व नीना सिलीमखान, प्रभाग १७ ः नीलेश खांडेपारकर, उदय मडकईकर व प्रज्योत वायंगणकर, प्रभाग २१ ः महेश चांदेकर, गंगाराम काळे, केदार शिरगावकर, प्रभाग २३ ः रूद्रेश चोडणकर, शैलेश उगाडेकर व सञ्चित वायंगणकर, प्रभाग २९ ः वनिता फर्नांडिस, प्रतिमा होबळे व यादव नाईक.
चौरंगी लढत : प्रभाग ३ ः सॅबेस्तियानो बार्रेटो, मार्गारिटा कुएल्लो, रोझारिया पो, ग्लोरिया पो, प्रभाग १९ ः डियोदिता डिक्रुझ, नीता गायतोंडे, विरा नुनीस, मारिया परेरा, प्रभाग २० ः अविनाश भोसले, सूरज कांदे, वीरेन महाले व कृष्णा शिरोडकर, प्रभाग २४ ः जितेंद्र केणी, दीक्षा माईणकर, मोहनलाल सरमळकर व मंदा शेटये, प्रभाग २६ ः ऑस्कर कुन्हा, रुई परेरा, एडवर्ड डेनिस व प्रेमानंद नाईक, प्रभाग ३० ः रूपेश हळर्णकर, श्यामसुंदर कामत, विविना नास्नोडकर व आयरिश रॉड्रिगीस यांच्यात लढत होईल.
पंचरंगी लढत
प्रभाग१४ ः समीर च्यारी, रत्नाकर फातर्पेकर, लक्ष्मण खराडे, रवीश खराडे व सीताराम नाईक हे भिडणार आहेत.
षट्कोनी लढत : प्रभाग २ ः नाझारेथ काब्राल, नेल्सन काब्राल, इव्हारिस्टो फर्नांडिस, रवींद्र कुर्टीकर, राजू मार्टिन्स व महेश शिरोडकर.

No comments: