वॉशिंग्टन,दि.१३
जपानला बसलेला भूकंपाचा झटका इतका शक्तिशाली होता की, त्याने पृथ्वीचा नकाशाच बदलवून टाकला आहे. खुद्द जपान हे राष्ट्र आपल्या मूळ स्थानापासून आठ फूट सरकले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना अमेरिकन भूगर्भ विभागातील भूकंप विशेषज्ञ पाल अर्ले म्हणतात, जपान आठ फूट सरकले आहे, हे सर्वच मान्य करतात. घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भूकंप व टेक्टॉनिक शिफ्ट प्रशांत व उत्तर अमेरिकी प्लेट यांच्यात निर्माण झालेल्या दाबामुळे हे घडले.
प्रशांत भूस्तर उत्तर अमेरिकन भूस्तराला दरवर्षी ३.३ इंचाच्या गतीने ढकलत असतो. परंतु भूकंप असा मोठा धक्का देऊ शकतो की, जो भूस्तराला आणखी पुढे सरकवू शकतो. एवढ्या शक्तिशाली भूकंपाने एवढा मोठा बदल घडून येऊ शकतो. गेल्या शुक्रवारी बसलेल्या ८.९ एवढ्या शक्तिशाली भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीने जपानच्या पूर्वोत्तर समुद्रकिनार्यावरील शहरांमध्ये हाहाकार उडवून दिला होता.
Monday, 14 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment