पणजी, दि. १६
उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांची संसदीय सल्लागार समितीवर भाजपने नियुक्ती केली आहे. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची मुदत जरी ३० एप्रिल रोजी पूर्ण होत असली तरी तीच समिती पुढे चालू ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय भाजपने घेतला असल्याचे लोकसभा विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनीसांगितले. संसदीय सल्लागार समितीचे अध्यक्षपद प्रमुख विरोधी पक्षालाच राखीव ठेवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या समितीवर खा. श्रीपाद नाईक यांच्यासह खा. अनंत कुमार हेगडे यांचाही समावेश असून वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि रमण डेक्का यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदीय सल्लागार समितीवर नव्या चेहर्यांना संधी देण्यासाठीच पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचेही सुषमा स्वराज यांनी सांगितले. मनोहर जोशी हे २०१० -११ सालच्या संसदीय सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम सांभाळणार आहेत. यशवंत सिन्हा हे संयुक्त संसदीय समिती व टू -जी स्पेक्ट्रम घोटाळा चौकशी समितीवर असल्याने त्यांची सल्लागार समितीवर दुसर्यांदा नियुक्ती झाली नसल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, गोपिनाथ मुंडे हेही यशवंत सिन्हा यांच्यासोबत वरील समित्यांवर काम करणार आहेत.
Thursday, 17 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment