पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
सत्तावीस नगरसेवक निवडून आणून पणजी काबीज करणार म्हणून मोठमोठ्या वल्गना करणार्या बाबूश मोन्सेरात यांनी मतदारांना विविध आमिषे व पैसे वाटून पणजी महापालिकेची सत्ता राखण्यात जरी यश मिळवले असले तरी पणजी काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. गेल्या वेळेपेक्षा आपल्या गटाचे चार जादा नगरसेवक निवडून आले असून बाबूश यांचे संख्याबळ घटले आहे, ही सूचक व समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पणजी फर्टच्या विजयी उमेदवार वैदेही नाईक यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी महिला मोठ्या संख्येने निवडून आलेल्या आहेत ही जमेची बाजू असून महिला शक्तीच्या बळावर सत्ताधार्यांवर अंकुश ठेवणार असल्याचेही वैदेही नाईक म्हणाल्या. ‘पणजी फर्स्ट’चे नेते अशोक नाईक यांचा पराभव विरोधकांनी पैशाच्या जोरावर मते विकत घेतल्यामुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
वैदेही विवेक नाईक या खुल्या १२ प्रभागातून नगरसेवक प्रसाद आमोणकर यांना पराभूत करून सलग दुसर्यांदा निवडून आल्या आहेत.
Tuesday, 15 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment