दयानंद नार्वेकरांचा सरकारला खडा सवाल
पणजी, दि. १६ (विशेष प्रतिनिधी)
कॅसिनो आणि जलसङ्गरी करणार्या बोटीतून मांडवी नदीत सोडल्या जाणार्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण लोकांच्या आरोग्याला बाधक असून, मासेही नदीतून दूर पळाले आहेत. जलसङ्गरी, कॅसिनोच्या व्यवहारातून सरकारला भरपूर पैसा मिळतो म्हणून परवाने नसलेल्या अनेक बोटींना दिवसाढवळ्या प्रदूषण करण्याची खुलेआम अनुमती तुम्ही दिली आहे काय, असा खडा सवाल हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकरांनी आज सरकारला केला.
कहर म्हणजे कॅसिनो प्राईडकडून सांडपाणी मॅजेस्टिक हॉटेलच्या हवाली केले जाते हा काय प्रकार आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. मांडवी नदीत सोडल्या जाणार्या या सांडपाण्यामुळे होणार्या प्रदूषणाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याची कल्पना आपण एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली होती. तसेच तपासणीची मागणी केली होती. मग सरकार यावर गप्प का, असा जळजळीत प्रश्न त्यांनी पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर व मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.
मांडवीत एकूण ७ कॅसिनो बोटी आणि ३२ जलसङ्गरी करणार्या बोटींना सरकारने परवानगी दिली होती. त्यांपैकी अनेक परवान्यांची मुदत संपून गेली आहे. विनापरवाना या बोटी सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
१८ जलसङ्गर बोटींपैकी ७ बोटींचे परवाने सुमारे २ वर्षांपूर्वीच संपले आहेत ही गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतानाच परवान्याविना या बोटी मांडवी नदीत कसा व्यवहार करतात असा प्रश्नही पर्रीकर यांनी केला.
भाजप आमदार मिलिंद नाईक यांनी हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. येत्या एका महिन्यात या बोटींना सगळे परवाने घ्यायला लावले जाईल, अशी हमी यावेळी मंत्री हळर्णकरांनी दिली. तसेच सांडपाणी प्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी सभागृहाला दिले.
Thursday, 17 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment