-अणुभट्टीत तिसर्यांदा स्फोट
-नागरिकांत प्रचंड घबराट
-मानवी जीवितालाही धोका
-घराबाहेर न पडण्याची सूचना
टोकियो, दि. १५
दुसर्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्ब हल्ल्याचा विदारक अनुभव सोसलेल्या जपानच्या नशिबी पुन्हा एकदा आण्विक किरणोत्सर्गाला तोंड देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महाभूकंप आणि सुनामीच्या प्रलयाचा तडाखा बसलेल्या ङ्गुकुशिमा प्रकल्पातील अणुभट्टीत आज लागोपाठ तिसर्यांदा स्ङ्गोट होऊन किरणोत्सर्ग सुरू झाल्याने जपानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी ङ्गुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात तिसरा हायड्रोजन स्ङ्गोट झाला. गेल्या चार दिवसांत अणुऊर्जा प्रकल्पातील हा तिसरा अणुभट्टी स्ङ्गोट आहे. त्यातच चौथ्या अणुभट्टीला अचानक आग लागल्याने आण्विक किरणोत्सर्ग सुरू झाला आहे.सुमारे २ लाख लोकांचे यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असताना अणू प्रकल्पाच्या जवळपास राहणार्या आणखी सुमारे दीड लाख लोकांनी किरणोत्सर्ग टाळण्यासाठी घरातून अजिबात बाहेर पडू नये, असा निर्वाणीचा इशारा जपान सरकारने जारी केला आहे.
ङ्गुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पापासून सुमारे २७० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी टोकियोमध्येही किरणोत्सर्गाचा थोडाङ्गार परिणाम जाणवू लागला आहे. किरणोत्सर्गाच्या पातळीत थोडी वाढ झाल्याने वातावरणात प्रचंड घबराट आहे. पण, अजूनही ३९ दशलक्ष नागरिकांना ङ्गारसा धोका नसल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
घराबाहेर पडू नका ः पंतप्रधान
किरणोत्सर्गाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान नाओतो कान यांनी आज देशाला उद्देशून टीव्हीवरून जाहीर संदेश दिला. दुसर्या महायुद्धानंतरच्या सर्वांत वाईट स्थितीला सध्या जपान तोंड देत असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. किरणोत्सर्गाची भीती असल्याने जपानी नागरिकांनी सध्या घराबाहेर पडू नये, असा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला. कृपया, घराबाहेर पडू नका. घरातच राहा. खिडक्या बंद करून घ्या आणि घरात वाराही शिरू देऊ नका. तुमचे कपडेही घरातच वाळत घाला, असे कळकळीचे आवाहन मुख्य कॅबिनेट सचिव युकिओ इदानो यांनीही केले आहे.
जपानमधून परतलेल्या
पत्रकारांची तपासणी
जपानमध्ये आलेल्या भूकंप आणि त्सुनामीसह किरणोत्सर्गाच्या वृत्तसंकलनासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांची त्यांच्या देशात परतल्यानंतर शारीरिक तपासणी करण्यात आली.
त्यांच्यावर किरणोत्सर्गाचा काही प्रतिकूल परिणाम तर झाला नाही ना, हे जाणून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आल्याचे समजते. ङ्गुकुशिमाहून परतलेल्या जवळपास सर्वच पत्रकारांची तपासणी केली जावी, असे आदेश बर्याच देशांच्या प्रशासनाने जारी केले आहेत. काही ठिकाणी तर विमानतळावरच तशा तपासणीची सोय करण्यात आली आहे.
ङ्गुकुशिमा परिसरात विमानांच्या उड्डाणास बंदी
ङ्गुकुशिमा येथे अणुभट्टीतून होत असलेल्या किरणोत्सर्गामुळे या परिसरात सुमारे ३० किलोमीटरपर्यंत विमानांच्या उड्डाणांवर बंदी आणली आहे.
किरणोत्सर्गाचा विमानांवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आल्याचे समजते. मात्र, यातून बचाव दलाच्या विमानांना आणि हेलिकॉप्टर्सना वगळण्यात आले आहे. एरवी कोणत्याही व्यावसायिक उड्डाणांवरही ङ्गारसा परिणाम होणार नसल्याचे सूत्रांद्वारे समजते.
Wednesday, 16 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment