पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी बढती मिळाली असून गुरुवार १७ मार्च रोजी ते न्यायमूर्तिपदाची शपथ ग्रहण करतील. शपथग्रहण सोहळा मुंबईत परवा संध्याकाळी होणार असल्याचे समजते. यावेळी महाराष्ट्रातील आणखी पाच न्यायमूर्तींचाही शपथविधी होणार आहे.
१९८६ साली न्या. बाक्रे हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायालयीन सेवेत रुजू झाले होते. तत्पूर्वी, त्यांनी साहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. २००३ साली त्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी अनेक गोमंतकीयांची यापूर्वी नियुक्ती झाली असून त्यांच्या पंक्तीत आता न्या. बाक्रे यांना स्थान मिळाले आहे. बढती मिळून न्यायमूर्ती झालेल्यांमध्ये न्यायाधीश गुस्ताव कुटो, युरीक सिल्वा, आर. के. भट्टा, नेल्सन ब्रिटो यांचा समावेश आहे; तर वकिली पेशातील गुरूदास डी. कामत, आर. एम. एस. खांडेपारकर, फेर्दीन रिबेलो, अविनाश लवंदे आणि एफ. रेस यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी नेमणूक करण्यात आली होती.
Wednesday, 16 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment