झाली पराभवाची जाणीव
नवी दिल्ली, दि. ३ - आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी कॉंग्रेस पक्ष फारसा आशावादी नसल्याचे दर्शवित वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी, आगामी सरकार कॉंग्रेस स्थापन करू शकली नाही तर विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे.
सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत दिग्विजय सिंग बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही पक्षावर सरकार स्थापन करण्याची क्षमता उरली नाही तर विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय कायम त्यांच्यापुढे खुला असतो. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येऊ शकले नाही तर आभाळ कोसळणार नाही. आमच्याकडे विरोधी पक्षात बसण्याचा पर्याय आहेच.
सध्या कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी विखुरलेल्या स्थितीत आहे. सपा, राजद आणि लोजपा यांनी वेगळी चूल केलीच आहे. मागील वेळी सोबत असणारे डावे पक्ष यावेळी नाहीत. पवारांनीही बिजद आणि डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसला स्वबळावर सरकार स्थापन करणे अतिशय कठीण राहणार आहे. याची जाणीव आता खुद्द कॉंग्रेसलाही झाल्याचे या वक्तव्यावरून लक्षात येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Monday, 4 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment