आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच
पणजी, दि.८ (प्रतिनिधी) : विविध निवृत्त अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवावाढीविरोधात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा निर्धार आज झालेल्या गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत संमत करण्यात आला.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलेल्या सेवावाढीचा निषेध करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.सरकारने या नेमणुका ताबडतोब रद्द कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला या नेमणुका मागे घेण्याचे आश्वासन दिले होते; प्रत्यक्षातील परिस्थिती नेमकी उलट आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना सेवावाढ व कंत्राटी पद्धतीवर नेमण्याचे सत्र सुरूच असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी दिली.
संघटनेच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. राज्य सरकारकडून संघटनेची थट्टाच सुरू असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. निवृत्त अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवावाढीमुळे सेवेत असलेल्या खालच्या अधिकाऱ्यांचा बढतीची संधी हिरावून घेतली जाते, त्यांच्यावर हा अन्याय आहे, अशी भावना त्यामुळे संघटनेत निर्माण झाली आहे.
Saturday, 9 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment