भोपाळ, दि. ८ : मायावतींचे उत्तरप्रदेशातील सरकार पाडणाऱ्या पक्षालाच पाठिंबा देऊ, या मुलायमसिंग यादवांच्या वक्तव्यावर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आज पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणाले की, मी मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्याने आश्चर्यचकित झालोय. जाहीररित्या नेतेमंंडळी अशी वक्तव्ये कशी काय देऊ शकतात? लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार विनाकारण बरखास्त करण्याचा अधिकार घटनेने केंद्र सरकारला दिलेला नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन नेतेमंडळींनी आपली प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. त्यासाठी आपली वक्तव्ये विचारपूर्वकच दिली पाहिजेे.
रालोआ संपुआच्या पुढेच राहणार
आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल हे रालोआच्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत अडवाणी म्हणाले की, भाजपा हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार यात शंकाच नाही. आमची आघाडी संपुआच्या समोरच राहणार. याचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच राहील. कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय कोणताच पक्ष मोठा होऊ शकत नाही, असेही अडवाणी यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
Saturday, 9 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment