वासंती गावडेचा खूनी तोच
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - दोन खून आणि एक बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला "सीरियल किलर' महानंद नाईक यांनी तिसऱ्या खुनाची कबुली देऊन संपूर्ण राज्यात खळबळ माजवली आहे. दि. १० सप्टेंबर १९९५ मध्ये वासंती गावडे या १९ वर्षीय तरुणीचा ओपा खांडेपार येथे गळा आवळून खून केला आणि त्यानंतर मृतदेह खांडेपार नदीत फेकून दिल्याची कबुली आज महानंद याने पोलिसांना दिली. १९९४ पासून महानंद याचे मुलीना फुस लावून त्यांचा खून करण्याचे सत्र सुरू असून अजून काही तरुणींचा खून केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फोंडा परिसरातील बेपत्ता असलेल्या तरुणी आणि ज्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही, अशा तक्रारीची पुन्हा नव्याने तपास करण्याचा निर्णय फोंडा पोलिसांनी घेतला आहे. महानंद याची "नार्को' चाचणी करणे अत्यंत महत्त्वाचे बनलेले असून त्यासाठी न्यायालयातून परवानगी मिळवण्यासाठी उद्या सकाळी फोंडा पोलिस न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महानंदने दिलेल्या कबुली जबाबानुसार, पावसाळा सुरू होता. दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी कु. वासंती हिला सर्व दागिने व बॅंकचा पासबुक घेऊन यायला सांगितले. ""आपले वडील तुला पाहण्यासाठी येणार असून तू सर्व दागिने घालून ये'' असे तिला सांगितल्याने ती गळ्यात दहा ग्रामची सोन साखळी घालून आली होती. तसेच बोरी येथे राहणारा तिचा मावसभाऊ याच्याकडे असलेला बॅंक पासबूकही ती त्यादिवशी घेऊन आली. वसंती अचानक पासबुक का घेऊन जाते, हे पाहण्यासाठी तिचा मावसभाऊही तिच्या पाठोपाठ आला होता. परंतु, महानंद त्याला चकवा देत वासंतीला आपल्या रिक्षात घेऊन खांडेपारच्या दिशेने निघाला. ओपा येथे पाण्याच्या टाकीजवळ जाऊन त्यानी गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर आपण खायला घेऊन येत असल्याचे सांगून महानंदने तेथून काही अंतरावर असलेल्या एका दुकानावर येऊन शीतपेय व बिस्कीट खरेदी केली. त्यानंतर तिला घेऊन तो खांडेपार नदीच्या काठावर असलेल्या एका भाटात आला. येथे तो तिच्याशी तासभर बोलत बसला. मारण्यापूर्वी तिला प्यायला शीतपेय व बिस्कीट खायला दिल्यात. त्यानंतर तिच्याच दुपट्याने गळा आवळला. अंगावरचे दागिने काढले आणि मृतदेह खांडेपार नदीत फेकून दिला. त्यानंतर तिच्या अंगावर असलेली दहा ग्रामची सोनसाखळी त्याने वरचा बाजार फोंडा येथील एका सोनाराला विकल्याची माहिती महानंद याने उघड केली आहे.
सकाळी घराबाहेर पडलेली वसंती घरी परतलीच नसल्याने तिच्या मावसभावाने फोंडा पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी ज्याप्रकारे बेपत्ता तरुणीची तक्रार हाताळायला हवी तोही त्याप्रकारे न हाताळल्याने तब्बल १४ वर्षांनी या खुनाला वाचा फुटली आहे. वासंती बेपत्ता झाली होती, त्यावेळी संशयित म्हणून महानंद नाईक याचे नाव पोलिसांना देण्यात आले होते. मात्र त्याकडे सवयी प्रमाणे दुर्लक्ष करून आणि महानंद याच्या मोर्चाला पळी बुडून पोलिसांनी त्या तक्रारीची फाईल बंद केली.
याविषयीचा अधिक तपास फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सी एल. पाटील करीत आहेत.
Monday, 4 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment