पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : जुवारी .पुलाला गेलेला तडा अजिबात धोकादायक नसल्याने वाहनचालकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. ही भेग बुजवण्यासाठी खात्याने काम हाती घेतल्याची माहिती सरकारी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, जुवारीवरील नव्या समांतर पुलाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ खात्याला पाठवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करून नवा पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले आहे.
जुवारी पुलावर नव्याने आढळलेला तडा सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी नवी डोकेदुखी बनली असली तरी या तड्याची पाहणी केली असता ती केवळ पुलावरील डांबरी थराला गेलेली भेग असल्याची माहिती सरकारी प्रवक्त्याकडून मिळाली. जुवारी पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगून हे बारीक दुरुस्ती काम लवकरात हाती घेण्यात येईल,असे सांगण्यात आले.मंत्री चर्चिल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, केंद्र सरकारला पत्र पाठवून या पुलाचे काम हाती घेण्यासाठी राज्य सरकारला परवानगी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
Friday, 8 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment