इस्लामाबाद, दि.५ : स्वात खोऱ्यातील शांतता करार संपुष्टात आल्याचे सोमवारी जाहीर केल्यानंतर आज तालिबानी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपला धिंगाणा सुरू केला. तालिबान आक्रमक झाल्याने स्वात खोऱ्यातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश पाकिस्तानी सरकारने जारी केले आहेत.
तालिबानने संपूर्ण स्वातभर आपले अतिरेकी रस्त्यावर उतरविले असून ते सर्वत्र शस्त्रास्त्रे घेऊन फिरत आहेत. या दरम्यान दिसणाऱ्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांवर ते बेछूट गोळीबार करीत आहेत. त्यामुळे पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना पोलिस ठाणे, तसेच छावण्यांमध्येच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातही काही ठिकाणी सुरक्षा दल आणि तालिबान्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.
तालिबान्यांनी मिंगोरा येथील रस्त्यांवर प्रचंड शक्तिशाली स्फोटके पेरली असून येथील पोलिस ठाण्यालाही घेरले आहे. याशिवाय, त्यांनी मिंगोरा परिसरातील सर्किट हाऊस आणि वीजनिर्मिती केंद्रांनाही वेढा घातला आहे. सध्या तालिबानने सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांना आपले लक्ष्य बनविले आहे. त्यांनी ठिकठिकाणी पोलिसांना शरण येण्याचे आवाहन केले आहे.
Wednesday, 6 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment