मुंबई, दि. २ - मुंबईवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव संशयित मोहम्मद अजमल आमीर कसाब हल्ला झाला त्यावेळी प्रौढ होता, असा निर्वाळा न्या. एम. एल. तहिलीयानी यांनी दिला आहे. त्यामुळे कसाबविरुद्धचा खटला सोमवारपासून दररोज आर्थर रोड येथील विशेष न्यायालयात चालवण्यात येणार आहे.
विशेष कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीला कसाबने हरकत घेताना हल्ला झाला त्यावेळी आपण १८ वर्षापेक्षा लहान वयाचा होतो, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर हा खटला बाल न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी त्याच्या वकिलाने केली होती. याला हरकत घेताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबने पोलिसांना स्वतःचे वय १८ पेक्षा जास्त असल्याची माहिती दिली होती, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर विशेष न्यायालयाने कसाबची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होते.
कसाबची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे वय १८ पेक्षा जास्त असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. शनिवारी हा अहवाल तपासून आणि वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने कसाब प्रौढ असल्याचा खुलासा केला.
Sunday, 3 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment