Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 2 April 2011

पेडणे ते काणकोणपर्यंत समांतर प्रवासी रेलमार्ग

वाहतूकमंत्र्यांची घोषणा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे महामंडळाच्या साहाय्याने काणकोण ते पेडणेपर्यंत समांतर प्रवासी रेलमार्ग उभारून दोन डब्यांची सोय केली जाणार आहे. या सेवेमुळे मोठ्या प्रमाणात या मार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहेच; पण त्याहीपेक्षा वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल. उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी कंत्राट प्रकरणी कायदा खात्याचा सल्ला मागवण्यात येत असून त्यानुसारच ङ्गौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
आज सभागृहात समाज कल्याण, वाहतूक व नदी परिवहन खात्यांच्या मागणीवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. पणजी येथे परिवहन भवन व मडगाव येथे अद्ययावत बसस्थानक प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात येणार आहे. खनिज वाहतुकीसाठी खास खनिज बगलमार्ग तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाईल. खनिज वाहतूक ट्रकांवर वाहतूक खात्याची करडी नजर असून कोणत्याही पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. म्हापसा, वास्को, केपे व सांगे नवीन बसस्थानके उभारण्यात येतील. केरी सत्तरी येथे नवीन तपासनाका सुरू केला जाणार आहे.
ङ्गोंडा व मडगाव येथे ट्रक टर्मिनस सुरू करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. कदंब महामंडळासाठी ११३ अतिरिक्त प्रवासी मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले असून या मार्गांची व्यवहार्यता तपासण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. चोडण मार्गावरील ङ्गेरीबोटीत सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास इतर ङ्गेरीबोटींवरही अशाच पद्धतीचे कॅमेरे बसवण्यात येतील, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गोमंत बालरथ योजनेतून पणजी व मडगाव शहर वगळल्याने समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर यांना बरेच धारेवर धरले. त्याला अनुसरून पणजी व मडगावातही गोमंत बालरथ सुरू केले जातील अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली.

No comments: