फोंडा, दि. २७ (प्रतिनिधी)
टाकी शांतीनगर फोंडा येथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल. टाकी शांतीनगर फोंडा येथे काल २६ मार्च रोजी रात्री ११.३० च्या सुमारास बांधकामावरून वहीद अहमद (३९) याचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा फोंडा पोलिसांनी १२ तासांत छडा लावून संशयित मोहन बिस्वाल (३२) या मूळ ओरिसातील कामगाराला आगशी येथे अटक आज दुपारी अटक केली आहे.
मोहन हा आठ महिन्यांपूर्वी कामाच्या शोधार्थ गोव्यात आला होता. त्याला वहीद याने काम मिळवून दिले. यापोटी वहीद हा मोहनकडे पैशांची मागणी करत होता. मोहन याने एकवेळा वहीद याला पैसेही दिले होते. त्यानंतर त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून खटके उडू लागले. काल २६ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास वहीद याच्या नेहमीच्या वाटेवर मोहन दबा धरून बसला होता. त्या वाटेने वहीद येताच त्याच्यावर मोहनने चाकूने हल्ला केला. यात वहीद जखमी होऊन खाली पडला. यानंतर मोहन तेथून पळून गेला. त्याठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या एका व्यक्तीने या घटनेची माहिती फोंडा पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित हालचाली करून मोबाइलच्या साहाय्याने फरारी मोहन याला आगशी येथे ताब्यात घेतले. यावेळी मोहन याने खुनाची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. फोंड्याचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Monday, 28 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment