Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 31 March 2011

सत्यसाईबाबांची प्रकृती स्थिर

अनंतपूर, दि. ३०
ङ्गुफ्ङ्गुस आणि छातीत काही किरकोळ तक्रारी उद्भवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सत्यसाईबाबांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वृत्त आहे. ८५ वर्षीय सत्यसाईबाबांच्या हृदयाचे ठोके काहीसे मंदावले होते. त्यामुळे त्यांना सोमवारी स्थानिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सौरव गांगुलीविरोधात
तृणमूलची तक्रार
कोलकाता, दि. ३०
पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत लोकांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड केली आहे. त्यामुुळे त्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करता येणार नाही. असे असताना त्याचे माकपशी संबंध असल्याची तक्रार तृणमूल कॉंग्रेसने केली आहे. मात्र, गांगुलीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
केरळ सरकारला
न्यायालयाची चपराक
नवी दिल्ली, दि. ३०
निवडणूक आचारसंहिता लागू असताना रेशनकार्डधारकांना दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला खीळ बसली आहे. उच्च न्यायालयाने सरकारला दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती अल्तमास कबीर आणि न्या. सिरियाक जोसेङ्ग यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या याचिकेवर ही स्थगिती देताना केरळ सरकारला नोटीस जारी केली. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने केरळ सरकारला ही योजना राबविण्यापासून रोखण्यात यावे अशी विनंती करणारी आयोगाची याचिका केरळ उच्च न्यायालयाने २१ मार्च रोजी ङ्गेटाळून लावली होती आणि सरकारला धोरणात्मक योजना राबविण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा निर्वाळा दिला होता.
संसद संस्थगित;
अध्यादेश जारी
नवी दिल्ली, दि. ३०
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्‍चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आले असल्याचा औपचारिक अध्यादेश राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज जारी केला. २१ ङ्गेबु्रवारी रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले होते. दोन टप्प्यात चालणारे हे अधिवेशन यावेळी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे एकाच टप्प्यात २५ मार्च रोजी गुंडाळण्यात आले. केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पी. जे. थॉमस यांची नियुक्ती, २-जी स्पेक्ट्रम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा, महागाई, विकिलिक्सचा गौप्यस्ङ्गोट आदी मुद्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरले असले तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकारला संयुक्त संसदीय समिती गठीत करण्यास भाग पाडले, हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य.
आंध्र प्रदेशच्या
कृषीमंत्र्यांचा राजीनामा
हैदराबाद, दि. ३०
आंध्र प्रदेशचे कृषीमंत्री वाय. एस. विवेकानंद रेड्डी यांनी आमदारकीचा कालावधी संपल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांच्याकडे दिला. त्यांच्या आमदारकीचा कालावधी काल संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असला तरी पदावर कायम राहण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, विवेकानंद रेड्डी हे दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे भाऊ असून कडप्पा किंवा पुलीवेंदुवल लोकसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अभिनेता शाईनीला
सात वर्षांचा कारावास
(मोलकरणीवरील बलात्कारप्रकरण)
मुंबई, दि. ३०
मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी जलदगती न्यायालयाने अभिनेता शाईनी आहुजा याला आज दोषी ठरविताना सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर शाईनी न्यायालयातच ढसाढसा रडला.
खटल्याच्या काळात ङ्गितूर होत आपल्यावर बलात्कार झालाच नाही असे त्या मोलकरणीने न्यायालयाला सांगितले. तथापि, या प्रकरणी दाखल प्राथमिक माहिती अहवालाला आधार मानून न्यायमूर्ती पी. एम. चौहान यांनी तिचा ङ्गितूरपणा अमान्य केला आणि शाईनीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. ही संपूर्ण सुनावणी इन-कॅमेरा करण्यात आली. यावेळी शाईनीची पत्नी अनुपमाही न्यायालयात उपस्थित होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रकरणाच्या सुनावणीत मोलकरणीने आपला कबुलीजबाब ङ्गिरविला आणि आपल्यावर बलात्कार झालाच नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. शाईनीकडे ज्या महिलेने मला काम मिळवून दिले होते, त्या महिलेच्या दबावापोटी आपण अशी तक्रार पोलिस ठाण्यात दाखविली होती असेही ती म्हणाली होती. या प्रकरणी शाईनीला १४ जून २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. तीन महिन्यांच्या कारावासानंतर त्याला जामिनावर मुक्तही करण्यात आले होते.

No comments: