पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): गोवा भाजपच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सिद्धनाथ बुयांव यांना तंबी देऊन व ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करूनही त्यांनी जाहीरपणे पक्षाचे आमदार दामोदर नाईक यांच्यावर टीका करण्याचे सत्र त्यांनी सुरूच ठेवल्याने अखेर पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदावरूनच त्यांना निलंबित करण्याचा आदेश आज प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काढला.
आमदार पार्सेकर यांनी यासंबंधीचे पत्र सिद्धनाथ बुयांव यांना पाठवले आहे. बुयांव यांनी आपल्या कृतीनेच पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.गत पालिका निवडणुकीवेळीही सिद्धनाथ बुयांव यांनी पक्षाचे आमदार दामोदर नाईक यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस जारी करून तंबी दिली होती. आता पुन्हा बुयांव यांनी आमदार दामोदर नाईक यांच्यावर प्रसारमाध्यमांकरवी उघड टीका केल्याने ही कारवाई करण्यात आली. कॉंग्रेस, युगोडेपा, सेव्ह गोवा असा प्रवास करून आलेले सिद्धनाथ बुयांव हे अलीकडे भाजपात दाखल झाले होते. एकाही पक्षात स्थिरावण्यात अपयशी ठरलेल्या बुयांव यांनी भाजप आमदारांवरच शरसंधान करण्यास सुरुवात केल्याने पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Tuesday, 1 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment