सैनिकही जनआंदोलनात
कैरो, दि. ३१ : इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्याविरोधातील जनक्षोभ टिपेला पोहोचला असून सामान्य जनतेबरोबरच आता लष्करातील सैनिकही जनआंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. दरम्यान सहा दिवसांत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १५० जण ठार तर हजारो जखमी झाले आहेत. देशात एकंदरच अनागोंदी माजली आहे. नव्या सरकारने अनुदाने कायम ठेवावीत, चलनवाढ रोखावी आणि अधिक रोजगार उपलब्ध करून द्यावेत, असा आदेश अध्यक्ष होस्नी मुबारक यांनी आपल्या नव्या पंतप्रधानांना दिला आहे, असे सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, आंदोलन तीव्र झाल्यामुळे अध्यक्षांची सत्तेवरील पकड काहीशी सैल झाल्याचे सांगितले जाते. इजिप्तमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तुर्कस्तान, सौदी अरेबिया, इस्राईल आणि ब्रिटनला केली आहे. अध्यक्ष मुबारक यांच्या जुलमी राजवटीला कंटाळलेल्या इजिप्शियन जनतेने उत्स्ङ्गूर्त आंंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या हिंसाचारात १५० जणांचा बळी गेला आहे. जनक्षोभामुळे देशभरात निर्माण झालेल्या गोंधळाचा ङ्गायदा घेत तुरुंगातील हजारो कैद्यांनी पलायन केले आहे. तसेच लुटारूंचा सुळसुळाटही अनेक ठिकाणी वाढला आहे. र्कफ्यू मोडून लुटारू मॉल्समधून अनेक चीजवस्तू लुटत असल्याचे दृश्य आहे. तर काही चोरांनी बँक व कलादालनांवरही डल्ला मारला आहे. जनतेच्या उत्स्ङ्गूर्त आंदोलनाला आता लष्कराचाही पाठिंबा मिळू लागला असून अनेक ठिकाणी लष्करी जवानही या आंदोलनात सहभागी होत असल्याचे दिसत आहे. सरकारी कार्यालयांच्या रक्षणासाठी चौकाचौकात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.
मुबारक मात्र ठाम
दरम्यान, मुबारक यांना पदच्युत करण्यासाठी सर्व बाजूने दबाव आणला जात असला तरी ते पद न सोडण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांचे विश्वासू सहकारी व गुप्तचर खात्याचे प्रमुख ओमर सुलेमान यांना उपाध्यक्ष म्हणून नेमले आहे तर नागरी विमान वाहतूकमंत्री अहमद शङ्गीक यांना पंतप्रधानपदी बसवले आहे. नोबेल पारितोषिक विजेते अहमद अलबदेर्इ यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. इजिप्तमधील अनागोंदीचा ङ्गटका मात्र मध्य पूवेर्तील सर्व देशांमधील शेअर बाजारांना बसला आहे.
भारतीयांच्या सुटकेसाठी उपाययोजना
इजिप्तमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या, विशेषत: महिला व मुलांच्या, सुटकेसाठी एअर इंडियाच्या विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने भारतीयांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून राजदूत आर. स्वामिनाथन व्यवस्थेवर देखरेख करत आहेत. इजिप्तमध्ये भारतीय वंशाच्या ३६०० व्यक्ती असून त्यापैकी २२०० राजधानी कैरोत आहेत. इजिप्तमधील अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश परराष्ट्र मंत्रालयाने जारी केले आहेत.
Tuesday, 1 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment