पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) ः देहविक्री व्यवसायात गुंतलेल्यांना संरक्षण देत असल्याच्या कारणावरून गुन्हा अन्वेषण विभागातील दोन पोलिस हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. उल्हास मळणेकर व पांडू गावस या दोघांना काल सायंकाळी सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले.
‘वेश्या व्यवसायातील दलालाकडून पैसे घेऊन त्यांना हे हवालदार संरक्षण देत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे’, असे गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक मंगलदास देसाई यांनी सांगितले. मात्र, पोलिस अधिकार्यांना माहिती नसताना हे पोलिस हवालदार या व्यवसायातील दलालांना संरक्षण देत होते का, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे निलंबित पोलिस हवालदार केवळ संरक्षण देत होते की ते स्वतः हे रॅकेट चालवत होते, याची चौकशी केली जाणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे काही महिन्यांपूर्वी गुन्हा अन्वेषण विभागच देहविक्री व्यवसायातील दलालांना संरक्षण देत असल्याचा आरोप झाला आहे.
Monday, 31 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment