बिच्चू हल्लाप्रकरण
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): सुपारी देऊन गुंड "बिच्चू' याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर प्राणघातक हल्ला घडवून आणलेला कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे आणि अन्य नऊ जणांविरुद्ध आज न्यायालयात पणजी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. भा.दं.सं. ३०७, ३२४, १२०(ब) व शस्त्र कायदा ४ व ५ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दि. २६ नोव्हेंबर २००९ रोजी भर दुपारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर तलवार आणि चॉपरने बिच्चू याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी हल्ला चढवला होता. यात बिच्चू आणि त्याचा अन्य एक साथीदार गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला झाला न्यायालयीन तुरुंगात असलेला आश्पाक बेंग्रे याने पन्नास हजार रुपये देण्याच्या करारावर हल्ला घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. प्रत्यक्ष हल्ला झाला त्यावेळी या हल्ल्याची सुपारी देणारा बेंग्रे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर उभा होता.
या घटनेनंतर पणजी पोलिसांनी चोवीस तासात हल्ला करणाऱ्या टोळीला गडाआड केले होते. यात फ्रान्सिस डायस, रमेश दळवी, मोहमद रेहमान, संजय लिंगुडकर, प्रवीण भातखंडे, नदीम खान, श्याम नाईक, सुलेमान किंडवर व ज्योकिम रिबेलो या सर्वांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला करण्यासाठी या सर्वांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून सध्या हे सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.
Wednesday, 24 February 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment