वाहनचालकांचा आंदोलनाचा इशारा
• रुग्णसेवा भत्त्याची मागणी
• सरकारला २१ दिवसांची मुदत
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील वाहनचालकांनी रुग्णसेवा भत्ता त्वरित द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा आज (दि.६) येथे घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोव्यातील सरकारी आरोग्य केंद्रांत काम करणार्या (विशेषत: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व म्हापसा येथील आझिलो इस्पितळ) माळी, सुरक्षारक्षक व नर्सेस यांना प्रत्येक महिन्याला रुग्णसेवा भत्ता देण्यात येतो. मात्र, रुग्णांची ने-आण करणार्या वाहनचालकांना सदर भत्ता देण्यात येत नाही. त्यामुळे दोन्ही इस्पितळांतील वाहनचालकांनी गोवा सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत अनेक वेळा सरकारकडे सदर भत्ता मिळावा म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे संतापलेल्या या वाहनचालकांनी आज सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सदर प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला २१ दिवसांची मुदत देण्याचे ठरले. या मुदतीत वाहनचालकांना न्याय न मिळाल्यास सर्व वाहनचालकांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
या बैठकीला सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर, सरचिटणीस जॉन नाझारेथ, प्रशांत देवीदास, बेनीदाता गुदिन्हो, स्नेहा मांद्रेकर यांची उपस्थिती होती.
Monday, 7 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment