• काणकोण तालुका सभेत इशारा
• सरकारला मे महिन्यापर्यंत मुदत
काणकोण, दि. १३ (प्रतिनिधी)
अनुसूचित जमातीच्या समाज बांधवांच्या प्रमुख मागण्यांसंबंधी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा राजस्थानच्या गुर्जर बांधवांप्रमाणे या समाजालाही सशस्त्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा उटाचे निमंत्रक आमदार रमेश तवडकर यांनी दिला आहे. आज (दि.१३) अनुसूचित जमातीच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व जमात बांधवांना न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी युनायटेड ट्रायबल असोसिएशनच्या (उटा) नेतृत्वाखाली काणकोण तालुका गौड मराठा समाजाच्या सहकार्याने अनुसूचित जमातीची जाहीर सभा कर्वे-गावडोंगरी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उटाचे अध्यक्ष माजीमंत्री प्रकाश वेळीप, गौड सारस्वत समाजाचे नामदेव फातर्पेकर, खोला जि. पं.चे कृष्णा वेळीप, खुशाली वेळीप, थॉमस फर्नांडिस, डॉ. उदय गावकर, गावडोंगरीचे सरपंच राजेश गावकर, विश्वास गावडे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार तवडकर म्हणाले की, अनुसूचित जमातीच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन त्यांचे आजवर बरेच शोषण करण्यात आले. मात्र आता हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. गेल्यावेळी उटातर्फे पणजी येथे करण्यात आलेले आंदोलन ही फक्त एक झलक होती. मात्र यावेळी ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रकारची चळवळ समाजबांधवांच्या बळावर उभारली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
उटाचे डॉ. गावकर यांनी प्रास्ताविक केले. गौड मराठा समाज काणकोणचे अध्यक्ष उमेश ऊर्फ दया गावकर यांनी स्वागत केले. पंच विशांत गावकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. फोडा शाखाध्यक्ष विश्वास गावडे, अनुसूचित कार्पोरेेशनचे अध्यक्ष खुशाली वेळीप, थॉमस फर्नांडिस, नामदेव फातर्पेकर, गोविंद गावडे यांनी उटाच्या विविध कार्याचा परिचय करून दिला व आंदोलनाविषयी मार्गदर्शन केले.
असा प्रकारच्या जाहीर सभा प्रत्येक तालुक्यात होणार असून येत्या मे महिन्यापर्यंत उटाच्या मागण्यात मान्य न झाल्यास सशस्त्र आंदोलनास तयार रहा असा इशारा यावेळी वक्त्यांनी दिला आहे.
Monday, 14 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment