मडगाव दि.१२ (प्रतिनिधी): अतिरिक्त सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्टा यांच्या निलंबनाविरुद्ध सुरू झालेल्या निषेधाचा वणवा दिवसेंदिवस फैलावत चालला असून आज दक्षिण गोवा वकील संघटनेने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाजवळील कोलवा चार रस्ता तिठ्यावर निषेध फलक लावून या निलंबनाचा धिक्कार केला. सोमवारपासून रोज सकाळी अर्धा तास अशाच प्रकारची निदर्शने करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
आज दिवसभर वकिलांचे धरणे सुरू होते. डेस्मंड डिकॉस्टा हे प्रामाणिक व कार्यक्षम न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांची तात्काळ मूळ जागी नेमणूक करावी; गोव्याला वेगळे उच्च न्यायालय मिळायलाच हवे; ते मिळाल्यानंतर असे प्रकार होणार नाहीत,अशी मागणी करणारे फलक निदर्शक वकिलांनी हाती घेतले होते. निदर्शनात दक्षिण गोव्यातील बहुतांश वकील सहभागी झाले होते.
सोमवारपासून धरणे धरण्याबरोबरच प्रधान सत्र न्यायाधीश बाक्रे यांच्या न्यायालयावर ते बहिष्कार घालणार आहेत व मागणी मान्य होईपर्यंत तो चालूच राहील असे ऍड. राजीव गोम्स यांनी सांगितले. दरम्यान, महानंद नाईक याला दोषमुक्त करणार्या सर्व निवाड्यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी गोवा सरकारवर दबाव येऊ लागला असून आता सरकार त्या प्रकरणात काय निर्णय घेते ते महत्त्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मडगावात दावे निकालात काढण्यासाठी आयोजित केलेली लोक अदालतन्यायिक मंडळाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे यांच्या अनुपस्थितीमुळेहोऊ शकली नाही. वाहतूक अपघातविषयक दावे निकालात काढण्यासाठी सदर लोक अदालत आयोजित करण्यात आली होती.
-------------------------------------------------------------------
उद्या जाहीर सभा
दरम्यान, जागृत नागरिकांनी सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता डिकॉस्टा यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ पणजीत एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही सभा गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात घेण्यात येईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment