ढाका, दि. १७
येथील बंगबंधु नॅशनल स्टेडियममध्ये गुरूवारी अकराव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांगला’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य कार्यक्रमाअगोदर आठ स्थानिक गायकांनी आपले कार्यक्रम सादर केले. कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी दर्शक मंत्रमुग्ध झाले. बांग्लादेशची प्रसिद्ध गायिका रूना लैला, सबीना यास्मिन आणि लोकगायिका मुमताज बेगम यांनी आपल्या गायकीने उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या महास्पर्धेत खेळणार्या सर्व १४ संघांचे कर्णधार पारंपरिक रिक्शातून मैदानावर अवतरले. बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ४३ दिवसीय महाकुंभास सुरूवात झाल्याची विधिवत घोषणा केली.
Friday, 18 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment