महाराष्ट्रातील दरवाढीचा अटळ परिणाम
ङ्गोंडा, दि. १२(प्रतिनिधी): शेजारील महाराष्ट्र राज्यात दुधाच्या दरात वाढ झाल्याने गोव्यातील दुधाच्या दरातही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी दूध दरवाढीच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात दुधाच्या दरात वाढ झाल्याने गोवा डेअरीलासुद्धा दूधदरात वाढ करावी लागणार आहे. मात्र ती कधीपासून करायची याबाबत अद्याप संचालक मंडळाने निर्णय घेतलेला नाही, असे श्री. सहकारी यांनी सांगितले.
गोव्यात दुधाचे मुबलक प्रमाणात उत्पादन होत नसल्याने गोवा डेअरीला दूध पुरवठ्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यांवरच अवलंबून राहावे लागते. गोवा डेअरीने परराज्यातील दुधाच्या खरेदीसाठी काही संस्थांशी करार केले आहेत. त्यामुळे वरील भागांत जेव्हा जेव्हा दुधाच्या दरात वाढ होते त्या त्या वेळी गोव्यातही दुधाच्या दरात वाढ ही करावीच लागते. महाराष्ट्रात स्थानिक सरकारने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर सदर दरवाढीचे गोवा डेअरीलाही आपोआपच पालन करावे लागते. दरवाढीनंतर चढ्या दराने दुधाची खरेदी करावी लागणार्या गोवा डेअरीला दूधविक्री मात्र कमी दराने करावी लागत असल्याने त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. ही आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अखेर दुधाच्या दरात वाढ करणे क्रमप्राप्त बनते. महाराष्ट्रात मागील महिन्यात दूध संस्थांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ साधारण तीन रुपयांनी झालेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गोवा डेअरीने १ मे २०१० रोजी दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर आता केवळ आठ - नऊ महिन्यांतच पुन्हा दूध दरवाढ करावी लागणार आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २००९, ११ ङ्गेब्रुवारी २०१० रोजी गोवा डेअरीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी दोन रुपये वाढ केली गेली आहे. यानुसार मागील सोळा महिन्यांत साधारण प्रतिलीटर सहा रुपये दरवाढ झालेली आहे. आता पुन्हा दरवाढ केल्यानंतर ती आठ ते नऊ रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोवा डेअरीने दुधाच्या दरात वाढ जाहीर केल्यानंतर स्थानिक दूध उत्पादक शेतकर्यांनाही वाढीव दर मिळतात. त्यामुळे दुधाच्या दरवाढीबरोबरच स्थानिक शेतकर्यांनाही दरवाढ मिळण्याची शक्यता आहे.
Sunday, 13 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Dear editor
Hike in milk rates
What Amul Has To Say. Please goa through and then demand the hike in mailk rates. I am attatching the news that appeared in Loksatta.
दुधाच्या दरवाढीस ‘अमूल’चा विरोध कायम Bookmark and Share Print E-mail
महानंदने दरवाढीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत डाव हाणून पाडला; आज निर्णय अपेक्षित
मुंबई, १४ फेब्रुवारी / प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे कारण पुढे करून ग्राहकांवर दूध दरवाढ लादण्याचा ‘महानंद’चा प्रयत्न आजच्या बैठकीतही ‘अमूल’ने हाणून पाडला. त्यामुळे ‘महानंद’ने दूध दरवाढीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय आज होऊ शकला नाही. आता उद्या पुन्हा या संदर्भात ‘महानंद’ने बैठक आयोजित केली असून तेव्हाही ‘अमूल’ने दरवाढीला ठाम विरोध करण्याचे ठरविले आहे.
कांदा, डाळी, भाजीपाला यांच्यापाठोपाठ दुधाच्या दरातही वाढ करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या एका वर्षांत दुधाच्या दरांमध्ये जवळपास तीनदा वाढ करण्यात आली आहे. असे असतानाही ‘महानंद’ने गाय आणि म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर तीन रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव सर्व कंपन्यांपुढे ठेवला आहे. राज्यातील अन्य भागांपेक्षा मुंबईत दुधाचे दर तीन-चार रुपये प्रति लिटर जास्तच आहेत. असे असताना ग्राहकांवर आणखी बोजा टाकणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका ‘अमूल’ने मांडली. दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना मिळणाऱ्या दुधाच्या दरांत आधीच प्रति लिटर १० रुपयांचा फरक आहे. त्यामुळे एक रुपया प्रति लिटर दरवाढीपेक्षा अधिक वाढ करण्याची गरज नाही, असे ‘अमूल’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील बहुसंख्य दूध सहकारी सोसायटय़ा राजकीय पुढाऱ्यांकडून चालविल्या जात आहेत आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. प्रति लिटर दोन ते १६ रुपयांपर्यंत शेतकऱ्ऱ्यांना वाढ दिल्यास ग्राहकांना दुधाचा दर प्रति लिटर २९ रुपये इतका होईल आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्या दरात मोठी तफावत निर्माण होईल. त्यामुळेच या दरवाढीला ठाम विरोध असल्याचे ‘अमूल’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, ‘महानंद’च्या कार्यकारी मंडळाने उद्याच्या बैठकीत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला तर आपल्या कमिशनमध्येही वाढ करून घेण्याची मागणी आग्रहाने पुढे रेटण्याचे वितरकांनी ठरविले आहे. दुधाची दरवाढ तीनदा करण्यात आलेली असतानाही वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. वितरकांना वाढ दिली नाही तर संप पुकारण्यासारखे हत्यारही उपसण्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचे कारण दाखवून दुधाची दरवाढ करू पाहणाऱ्या ‘महानंद’च्या दुधाची विक्री आता प्रतिदिन जेमतेम साडेचार लाख लिटरवर आली आहे. असे असताना ‘महानंद’चा नफा वाढत असल्याचा दावा कसा करण्यात येतो, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
milk rates not to be raised.
Post a Comment