केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमोर प्रस्ताव
पणजीत मिनी कन्व्हेन्शन सेंटर उभारणार
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): इफ्फी’ उद्घाटन सोहळ्यासाठी कला अकादमीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहाची जागा अपुरी पडते; मडगाव येथील रवींद्र भवनात जादा आसनव्यवस्था असल्याने हा सोहळा तिथे हालवणे शक्य आहे काय, याचा आढावा घेण्यात येईल, असे स्पष्ट संकेत आज मुख्यमंत्री कामत यांनी दिले. सध्याच्या मनोरंजन संस्थेच्या ठिकाणी मिनी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा एक प्रस्ताव असून त्यासंबंधी नियोजन आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज इथे एका पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली. पणजीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहाची आसनसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. मडगाव येथील रवींद्र भवनात मात्र १३०० प्रेक्षकांची सोय करता येणे शक्य आहे. यासंबंधी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली असून अखेरचा निर्णय त्यांनी घ्यावयाचा आहे, असेही मुख्यमंत्री कामत म्हणाले. मंत्रालयाचे सचिव रघू मेनन यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकार्यांचे पथक गोव्यात आले असून ‘इफ्फी’ संबंधी उभारण्यात येणार्या पायाभूत सुविधांबाबत त्यांनी राज्य सरकारच्या अधिकार्यांशी सखोल चर्चा सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.
मिनी कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्ताव
सध्याच्या गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्यालयाजवळील जागेत मिनी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे दोन हजार आसनव्यवस्थेचे हे संेंटर असणार आहे व तिथे दुमजली पार्किंग व्यवस्थेची सोयही करण्यात येणार आहे. रघू मेनन यांनी आपल्या भेटीत या जागेची पाहणी केल्याचेही ते म्हणाले.
Thursday, 17 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment