काळ्याबाजारात विकण्यासाठी नेला जात असल्याचा संशय
पेडणे,दि. ९ (प्रतिनिधी): काळ्याबाजारात घेऊन निघालेला रेशनिंगच्या तांदळांनी भरलेला ३२० पोत्यांचा ट्रक पेडणे पोलिसांनी पत्रादेवी चेकनाक्यावर जप्त केला. यातील ट्रक (क्र. एम.एच.०७--१९३६) जप्त करून ट्रकचालक विजय पांडुरंग महाले (सावंतवाडी) क्लीनर उमेश शिरोडकर (सावंतवाडी बांदा) ट्रक मालक सतीश गावस (वाफोली-महाराष्ट्र) व स्वस्त धान्य दुकानाचे मालक देवेंद्र शिंदे खोली-म्हापसा यांना अटक करण्यात आली आहे.
म्हापशाचे पोलिस अधीक्षक सॅनी तावारिस यांना निळ्या रंगाचा ट्रक तांदूळ घेऊन म्हापशातून महाराष्ट्रात जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार न्हयबाग सातार्डा व पत्रादेवी या दोन महत्त्वाच्या पोलिस चेकनाक्यांवर बंदोबस्त ठेवून जाणार्या वाहनांची तपासणी केली जात होती. दोडामार्ग येथेही चेकनाक्यावर पोलिस तैनात केले होते.
दुपारी १.३० वाजता पत्रादेवी चेकनाक्यावरून निळ्या रंगाचा ट्रक (एमएच ०७-१९३६) जात असता पोलिसांनी तो पकडला. ट्रक ताडपत्री घालून पॅक केला होता. आता काय आहे, असे पोलिसांनी ट्रक चालकाला विचारले असता त्याने तांदूळ असल्याचे सांगितले. पोलिसांनी तांदळाच्या मालाची कागदपत्रे मागितली; परंतु ते देऊ शकले नाही.
नंतर ट्रक ताब्यात घेऊन सेमी तावारिस यांना कळवण्यात आले. त्यानुसार श्री. तावारिस, पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, पॉस्कॉल फर्नांडिस, मिलिंद मोरे, प्रेमानंद सावंत देसाई, लहू राऊळ, बबन भगत, सतीश नाईक व रामकृष्ण शिंदे हे घटनास्थळी पोचले. त्यांनी ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक, क्लीनर यांनाही ताब्यात घेतल्यानंतर तांदूळ कोठून आणले याची पोलिसांनी चौकशी केली. त्यावर खोर्ली म्हापसा येथील देवेंद्र शिंदे यांनी त्यांचे आपल्या स्वस्त धान्य दुकानातील सदर तांदूळ सतीश दत्ताराम गावस (वाफोली) यांना विकले होते, अशी माहिती मिळताच स्वस्त धान्य दुकान मालक देवेंद्र शिंदे व ट्रकमालक सतीश गावस यांनाही ताब्यात घेण्यात आले. नंतर पोलिसांनी अत्यावश्यक सेवा कायदा १९५५ नुसार कलम ३ व ७ त्याचप्रमाणे भारतीय दंडसंहिता कलम १२० नुसार गुन्हा नोंद केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा रेशननिंग तांदळाचा कोटा काळ्याबाजारात विकण्याचा प्रयत्न सुरू होता.
Friday, 10 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment