नवी दिल्ली, दि. ८ : पुढल्या आठवड्यात सरकारी तेल कंपन्या पेट्रोलच्या दरात १.५० ते २ रुपये आणि डिझेलच्या दरात २ रुपयांची वाढ करण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याने सांगितल. पेट्रोलची दरवाढ संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच १३ डिसेंबरला करण्यात येईल. दरवाढीच्या मुद्यावर विचार करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांच्यात काल बैठक झाली होती.
स्फोटविरोधात भाजपचा मोर्चा
लखनौ, दि. ८ : काल वाराणसी येेथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा भाजपाने तीव्र निषेेध केला असून, दहशतवादाच्या वाढत्या धोक्याच्या विरोधात आज एक निषेध मोर्चा काढला. संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी येथील विधानभवन ते शहीद चौक या तीन किमी लांबीच्या रस्त्यावर निषेध मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम् आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
पाकमध्ये आत्मघाती स्फोटात १७ ठार
पेशावर, दि. ८ : पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील कोहाट येथील बसस्थानकावर आज झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान १७ जण ठार आणि ३१ जण गंभीर जखमी झाले.
बसस्थानकावर उभ्या असलेल्या एका बसमध्ये आत्मघाती अतिरेक्याने भीषण बॉम्बस्फोट घडवून आणल्यामुळे बसस्थानकात एकच गोंधळ उडाला.
Thursday, 9 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment