मुंबई, दि. ७ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांना प्रतिष्ठेचा ‘होमी भाभा’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. इंडियन न्युक्लिअर सोसायटीच्या २१ व्या वार्षिक परिषदेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
काकोडकर यांना हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक युकीया अमानो यांच्या हस्ते १७ जानेवारीला मुंबईत होणार्या वार्षिक परिषदेत प्रदान करण्यात येईल. अशी माहिती सोसायटीचे सचिव आर. के. सिंग यांनी दिली. अमानो या परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील. न्यूक्लिअर रिऍक्टर टेक्नॉलॉजी अँड रिऍक्टर सेफ्टी पुरस्कार दिलीप सहा आणि न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक के. बी. दीक्षित यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे.
Wednesday, 8 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment