नवी दिल्ली, दि. ४ : अरबी समुद्रात समुद्र चाचेगिरी करणार्या पंधरा पाकिस्तानी व चौघा इराणी नागरिकांना भारतीय नौदलाच्या जवानांनी पकडले असून ज्या गलबतावर ते होते तेदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
अरबी समुद्रातील लक्षद्वीपमधील बित्रा बेटाजवळ संशयास्पद स्थितीतील एक गलबत ‘आयएनएस राजपूत’ या भारतीय विनाशिकेवरील नौदलाच्या जवानांना काल दुपारी दोनच्या सुमारास दिसले. त्यावेळी आयएनएस राजपूत विनाशिका नेहमीच्या गस्तीवर होती.
या गलबताला व त्यावरील १९ विदेशी नागरिकांना नंतर लक्षद्वीपमधील कवरात्ती येथे आणण्यात येऊन तेथे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. अरेबियन समुद्रात बहुआयामी नौदल तैनात करून चार दिवसही लोटले नाही तोच हे यश मिळाले आहे. अलीकडील काही आठवड्यांत या भागांत समुद्री चाचेगिरीच्या घटनांत मोठी वाढ झाल्याने या भागात नौदलाने मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून त्यानुसार गस्त वाढविली होती.
Sunday, 5 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment