पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचा येत्या महिन्यात होणार्या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचे सुरक्षा विभागातील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. रॉय यांना मारण्याची सुपारी दिल्याची कथित माहिती पोलिस चौकशीत एका टोळीकडून उघडकीस आल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती.
या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन त्यांची सुरक्षा कायम ठेवावी की ती काढून घ्यावी, यावरही विचार केला जाणार आहे. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्या सुचनेनुसार ही बैठक घेतली जाणार आहे. विचारविनिमय केल्यानंतर सदर बैठकीत याप्रकरणी निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
रॉय यांच्यासाठी सुपारी दिलेल्या व्यक्तीचे नाव पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप संबंधितास अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मायकल नामक तरुणाने ही माहिती पोलिसांना दिली होती. कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये बंदूक दाखवून लूटमार करणार्या या टोळीला पोलिसांनी गजाआड केले होते. त्यांच्याकडून ही माहिती उघडकीस आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
सध्या रॉय यांना दोघे सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले आहे. ही माहिती सुरक्षा विभागाचे अधीक्षक टॉनी फर्नांडिस यांनी दिली.
Thursday, 9 December 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment