पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने "दुदू' या ड्रग माफियाच्या चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला सुपूर्द केला आहे. "दुदू' हा अमली पदार्थविरोधी पथकाचा निलंबित शिपाई संदीप परब ऊर्फ "कामीण' व विलास नामक पत्रकाराला हप्ता देत होता, असे या अहवालात म्हटले आहे.
"मी मोठी रक्कम संदीप परब ऊर्फ कामीण याला दिली. तसेच विलास या पत्रकारालाही मी पैसे देत होतो, असा दावा दुदू याने केल्याचे तपास अहवालात म्हटले आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे उपनिरीक्षक सुनील गुडलर यांनी केलेल्या या चौकशीत ही बाब उघड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आशिष शिरोडकर याला जामीन मंजूर करताना दिलेल्या आदेशात अहवालाचा दाखला देताना म्हटले आहे की, "दुदू' हा अमली पदार्थ विरोधी पथकाचा निलंबित शिपाई संदीप परब ऊर्फ "कामीण' आणि त्या पत्रकाराला हप्ता देत होता. माझ्या विरोधी लेखनामुळे मला गोव्यात राहणे मुश्कील झाले होते. तेव्हा मी संदीप परब याच्यामार्फत त्या पत्रकाराशी संपर्क साधला, असा दावा या प्रकरणातील प्रमुख आरोपी दुदू याने केला आहे. "दुदू'च्या चौकशीचा हा अहवाल न्यायालयाला सुपूर्द करण्यात आला आहे.
Friday, 4 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment