Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 30 May 2010

हेडलीच्या चौकशीसाठी भारतीय पथक आज जाणार

नवी दिल्ली, दि. २९ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी डेव्हीड हेडलीची चौकशी करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक उद्या अमेरिकेेला रवाना होत आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला हेडलीने मदत केल्याचा आरोप असून हेडली सध्या अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयच्या ताब्यात आहे.
अमेरिकेला जाणाऱ्या या पथकात "राष्ट्रीय चौकशी संस्था'(एनआयए)चे तीन सदस्य आहेत. एका कायदा अधिकाऱ्याचाही त्यात समावेश आहे. भारतीय चौकशी अधिकाऱ्यांचे एक पथक अमेरिकेेच्या कायदा विभागाच्या संपर्कात राहणार आहे. डेेेव्हीड हेडलीच्या वकिलालाही हे पथक भेेटणार आहे. हेडली व भारतीय पथकाच्या भेटीदरम्यान हेडलीचा वकीलही उपस्थित राहणार आहे. पण अजूनही हे स्पष्ट झालेले नाही की भारतीय पथक हेडलीची चौकशी किती तास किंवा किती दिवस करणार आहे.
भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केेलेल्या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हा डेव्हीड हेडली असल्याचा हेडलीवर आरोप आहे. हेडलीला मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. अमेरिकन न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमाफत चौकशी करण्यास भारतीय अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.

No comments: