पणजी, दि. २ (प्रतिनिधी): ड्रग व भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेला पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ५० हजार रुपयाच्या हमीवर व पोलिस उपमहानिरीक्षकांसमोर हजेरी लावण्याच्या अटीवर जामिनमुक्त केले. त्याचप्रमाणे, किनारी भागात न जाण्याची अटही न्यायालयाने त्याला घातली आहे.
तब्बल दोन महिन्यांनंतर शिरोडकर याची जामिनावर सुटका झाली आहे. अजून एक पोलिस उपनिरीक्षक व पाच पोलिस शिपाई न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाचा आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्यामुळे आशिष शिरोडकर याच्या जामिनासंदर्भातील तपशील मिळू शकला नाही.
शिरोडकर याला पोलिस ड्रग माफिया संबंध प्रकरणात निलंबित करून अटक झली होती. या प्रकरणाची चौकशी "सीआयडी' मार्फत सुरू होती. आशिष हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा "सीआयडी'ने न्यायालयात केला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांत या प्रकरणावर कोणताही फारसा उजेड टाकण्यात आला नसल्याचे न्यायालयात युक्तिवादावेळी उघड झाले होते.
हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवणार हा असा प्रश्न करून राज्य सरकारला निर्णय कळवण्याची सूचना खंडपीठाने केली होती. त्यावर आज सरकारने पोलिस महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अधिकारी नेमण्याची शक्यता असल्याचे गोवा खंडपीठाला कळवले. त्यामुळे हे प्रकरण कोणत्याही स्थितीत "सीबीआय'कडे देण्याची तयारी नसल्याचे सरकारने न्यायालयाला सूचित केले आहे.
दरम्यान, ड्रग माफिया "अटाला' याची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने "यू ट्यूब'वर आशिष शिरोडकर व ड्रग माफिया अटाला यांचे कशा प्रकारचे संबंध होते, हे दाखवणारे व्हिडिओ संकेतस्थळावर जारी केले होते. मात्र अद्याप "सीआयडी'ने लकी हिची जबानी नोंद करून घेतलेली नाही.
Thursday, 3 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment