Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 June 2010

झारखंडमध्ये दोन वर्षांत दोन वेळा राष्ट्रपती राजवट!

रांची, दि. १ : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीला राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी मान्यता दिल्याने झारखंडमध्ये दोन वर्षात दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीनंतर आज या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मागील वर्षी १९ जानेवारी रोजी येथे पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. १५ नोव्हेंबर २००० रोजी स्वतंत्र झारखंड राज्य अस्तित्वात आल्यापासून दहा वर्षांत या राज्याने सात मुख्यमंत्री पाहिले.
झारखंडचे मुख्यमंत्रिपद शिबु सोरेन यांनी सोडल्यानंतर कोणताही पक्ष सरकार स्थापनेसाठी समोर न आल्याने येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय झाला. स्वत: सोरेन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊनही त्यांना विधानसभा सदस्यत्व मात्र मिळविता आले नाही.

No comments: