बंगलोर, दि. २९ - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आज आपल्या कारकीर्दीची दोन वर्षे पूर्ण केली. दक्षिणेत प्रथमच भाजपाने राज्यात सत्ता प्राप्त केली.
दक्षिणेतील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार म्हणून येदीयुरप्पा यांच्याकडे बघितले जात असले तरी त्यांनाही आतापर्यंत स्वपक्षातील सहकाऱ्यांबरोबरच विरोधकांचा विरोध सहन करीत राज्य हाकावे लागले आहे. कॉंगे्रस-जदएसने त्यांच्यावर सतत हल्ले करणे जारी ठेवले आहे तर त्यांच्या मंत्रिमंडळातील काही बंडखोरांनी बंडाचा झेंडा उभारला होता. यातून त्यांनी मार्ग काढत दोन वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. ३० मे २००८ रोजी कर्नाटकात भाजपाचे सरकार सत्तेवर आले होते. सत्तेवर आल्या आल्याच येेदीयुरप्पा यांना शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागले होेते. यानंतर चर्चवरील हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या.
गेल्या सप्टेंबर महिन्यात त्यांना राजकीय स्थैर्य प्राप्त झाले व त्यांनी प्रशासकीय कारभार सुधारण्याच्या दिशेने पावले उचलली. यातच राज्यात आलेल्या पुराने सारे काही बिघडवून टाकले. त्यातूनही मुख्यमंत्री येदीयुरप्पा मार्ग काढत असतानाच मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारलेे. हे बंडही त्यांनी योग्यप्रकारे मोेेेेडून काढीत राज्याच्या विकासाकडे आता लक्ष पुरविले आहे.
Sunday, 30 May 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment