‘पँन्जीमाइट्स्’तर्फे २९ उमेदवारांची यादी जाहीर
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराला भ्रष्ट राजवटीतून मुक्त करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. गेल्या पाच वर्षांत बाबूश मोन्सेरात समर्थक गटाकडून या शहराची ज्या पद्धतीने विटंबना सुरू आहे त्याचा वचपा काढण्यासाठी पणजीतील समस्त लोकांनी एकत्रित येण्याचे आवाहन डॉ. ऑस्कर रिबेलो व अरविंद भाटीकर यांनी केले. भाजप समर्थक ‘पणजी फर्स्ट’, राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक गट व अपक्ष यांपैकी २९ निवडक, प्रामाणिक व स्वच्छ उमेदवारांची यादी जाहीर करून या लोकांना निवडून आणण्याचा संकल्प आज ‘पॅन्जीमाइट्स् इनिशीएटीव्ह फॉर चेन्ज’ या गटाने सोडला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत डॉ. ऑस्कर रिबेलो व अरविंद भाटीकर यांनी ही माहिती दिली.
लोकांना सहजरीत्या विकत घेता येते अशा आविर्भावात वागणार्या नेत्यांना आता अद्दल घडवण्याची गरज आहे. पणजी महापालिकेच्या निमित्ताने हा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे व पणजीतील समस्त लोकांनी या प्रयोगाला सहकार्य करून तो यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी केले. दरम्यान, या यादीला पणजीतील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी आपली संमती दिली आहे. हे सर्व लोक आपापल्या व्यवसायात व्यस्त असतात व त्यामुळे त्यांना या राजकीय नेत्यांप्रमाणे वारंवार रस्त्यावर उतरणे शक्य नाही. या लोकांना प्रत्यक्ष तळागाळातील लोकांशी संपर्क ठेवणेही शक्य होत नाही. परंतु, निदान सर्वसामान्य लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यासमोर भ्रष्ट राज्यकर्त्यांचा पर्दाफाश करून पणजी महापालिकेवर चांगल्या लोकांची निवड होण्यासाठी ही संघटना प्रयत्न करणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सुशिक्षित समाज हा नेहमीच मतदानापासून दूर राहतो व त्यामुळेच या भ्रष्ट लोकांचे फावते. यावेळी मात्र सर्वांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे व एक नवी क्रांती पणजीत घडवण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी केली.
या संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांत प्रभाग ः १-किरण जांबावलीकर, प्रभाग ः२- एव्हरीस्टो फर्नांडिस, प्रभाग ः३- बार्रेटो सॅबिस्टीयन, प्रभाग ः४-प्रभाकर डोंगरीकर, प्रभाग ः५-शीतल नाईक, प्रभाग ः६-आलेक्स फेलिझादो, प्रभाग ः७-श्वेता लोटलीकर, प्रभाग ः८-तुकाराम चिन्नावर, प्रभाग ः९-सुरेंद्र फुर्तादो, प्रभाग ः१०- रूथ फुर्तादो, प्रभाग ः११-ऍश्ली रोझारीयो, प्रभाग ः१२-वैदेही नाईक, प्रभाग ः१३-सीमा पेडणेकर, प्रभाग ः१४-अशोक नाईक, प्रभाग ः१५-शेखर डेगवेकर, प्रभाग ः१६-नीना सिलीमखान, प्रभाग ः१७-नीलेश खांडेपारकर, प्रभाग ः१८-समीर च्यारी, प्रभाग ः१९-दियोदिता डिक्रुझ, प्रभाग ः२०-अविनाश भोसले, प्रभाग ः२१-महेश चांदेकर, प्रभाग ः२२- माया तळकर, प्रभाग ः२३-शैलेश उगाडेकर, प्रभाग ः२४-दीक्षा माईणकर, प्रभाग ः२५-शुभदा धोंड, प्रभाग ः२६-ऑस्कर कुन्हा, प्रभाग ः२७-शुभम चोडणकर, प्रभाग ः२८-निवेदिता चोपडेकर, प्रभाग ः२९ (कुणीही नाही), प्रभाग ः३०-आयरिश रॉड्रिगीस यांचा समावेश आहे.
या यादीला मान्यता दिलेल्यांत डॉ. बॉस्युएट आल्फोन्सो, जे. सी. आल्मेदा(निवृत्त आयएएस), प्रा. फ्रँक आंताव, प्रा. रामोला आंताव, डॉ. श्याम भंडारी, डॉ. दीप भंडारी, अरविंद भाटीकर (निवृत्त आयएएस), स्नेहलता भाटीकर, हेन्री ब्रीटो, ऍड. अरुण ब्राझ डिसा, डॉ. प्रमोद दुकळो, चिकुटो उर्सुला डिसोझा, सिल्वेस्टर डिसोझा, डॉ. अजॉय एस्टाबिरो, आंतोनिया इनास फ्रोएस, मनोज जोशी, ऍड. राजेंद्र कामत, डॉ. गोविंद कामत, प्रा. गोविंद खंवटे, नागेश करमली (स्वातंत्र्य सैनिक ), सुरेश कुडचडकर, डॉ. महेंद्र कुडचडकर, डॉ. साईदत्त कुवेलकर, बर्नाडेट लोबो, ऍड. अमरदीप मडकईकर, फ्रान्सिस मिनेझिस, ऍड. जतीन नाईक, तारा नारायण, अँजेलो पाईस, गुरूदास पै, ए. एक्स. गोम्स परेरा, कमला रत्नम, ओरीया एस. रेगो, डॉ. ऑस्कर रिबेलो, मानू रिबेलो, प्रजल साखरदांडे, ए. व्यकंटरत्नम (निवृत्त आयएएस) आदींचा समावेश आहे.
Wednesday, 2 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment