लीबियाला जाळून टाकू : गडाङ्गी
लीबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मर गडाङ्गीने संपूर्ण लीबियाला जाळून टाकण्याची धमकी दिली असून अमेरिकेने लीबियाविरोधात एकतर्ङ्गी कडक उपाययोजना तयार करणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्रिपोली येथील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे. तसेच लीबियासोबतचे सैन्य संबंध तोडले आहेत. दरम्यान, लीबियात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी आणण्याचे काम भारत सरकारने सुरू केलेे आहे.
तरुणाईत भारत जगात ‘नंबर वन’
गुवाहाटी, दि. २६ : तरुणाईत भारत देश जगात ‘नंबर वन’ असून, १० ते १९ या वयोगटातील सुमारे २४.३ कोटी तरुण भारतात आहेत, अशी माहिती आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनी आज दिली. ‘द स्टेट ऑङ्ग द वर्ल्ड चिल्ड्रेन रिपोर्ट’ हा युनिसेङ्गचा कार्यक्रम आज राजभवनात जाहीर करताना पटनायक म्हणाले की, संपूर्ण जगात १.२ अब्ज तरुण आहेत. यातील २० टक्के वाटा भारताचा आहे.
उद्या केंद्रीय अर्थसंकल्प
नवी दिल्ली, द. २६ : महागाईने गाठलेले शिखर, देशाची विद्यमान आर्थिक स्थिती आणि काही राज्यांमध्ये याचवर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राजकीय समीकरणे डोळ्यांपुढे ठेवून काही निवडक घटकांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये होण्याचीच जास्त शक्यता आहे.
सहा नक्षलवादी चकमकीत ठार
बांका (बिहार), दि. २६ : बिहारच्या बांका जिल्ह्यातील काटोरिया या गावात आज पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाच्या जवानांनी एका चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार केले असून, काही नक्षलवादी जखमी झाले; तर काहींनी पळ काढला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एकही जवान जखमी झाला नाही.
सोनियांनी भूमिका स्पष्ट करावी : उमाभारती
भोपाळ, २६ ङ्गेबु्रवारी : योगगुरू बाबा रामदेव यांच्याबाबत कॉंगे्रसमधील काही नेत्यांनी जी वादग्रस्त विधाने केली आहेत, ती कॉंगे्रस पक्षाला मान्य आहेत काय, याबाबत कॉंगे्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्वरित स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी आज येथे केली.
जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
जम्मू , दि. २६ : प्रचंड बर्ङ्गवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून, यामुळे काश्मीर खोर्याचा उर्वरित देशासोबतचा संपर्क तुटलेला आहे. काल रात्रीपासूनच काश्मीर खोर्यातील विविध भागांत जोरदार बर्ङ्गवृष्टी आणि मुसळधार पाऊस पडत आहे. अवघ्या एकाच आठवड्यात हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची ही दुसरी वेळ आहे.
Sunday, 27 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment