Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 29 March 2010

डॉ. केदार हॉस्पिटलमध्ये शुक्राणू जतनाची सुविधा

पणजी, दि.२८ (प्रतिनिधी)- टेस्ट ट्यूब गर्भधारणेसाठी लागणारे शुक्राणू जतन करून ठेवण्याची सुविधा गोव्यात प्रथमच डॉ. केदार हॉस्पिटल पणजी येथे उपलब्ध झाल्याचे डॉ. केदार फडते यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. जयश्री फडते आणि ज्या जोडप्यावर जतन करून ठेवलेल्या शुक्राणूंचा वापर करण्यात आला ते यु.के.येथील कॅ टी आणि ख्रिस्तोफर रॉक्लीफ उपस्थित होते.
डॉ. केदार पुढे म्हणाले की आतापर्यंत आमच्या हॅास्पिटलमधून सुमारे २०० मुलांना टेस्ट ट्यूब माध्यमातून जन्म देण्यात आला. डॉ. केदार आणि डॉ. जयश्री गेल्या २० वर्षापासून डॉक्टरी क्षेत्रात कार्यरत असून आपल्या आवडत्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टींचा शोध लावण्यास त्या खूप आवडते. जर्मनी, मुंबई आणि ऑस्ट्रेलिया येथे प्रशिक्षण घेऊन १९९९ सालापासून त्यांनी आय. व्ही. एफ. आणि आय सी एस आय कार्यक्रम सुरू केला. २००१ साली केदार रुग्णालयात प्रथम टेस्ट ट्यूब गर्भधारणा प्रयोग यशस्वी झाला आणि तो पुढे चालूच राहिला.
जतन केलेल्या शुक्राणूचा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगताना डॉ. केदार यांनी कॅटी आणि ख्रिस्तोफर यांच्यावर केलेल्या क्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

No comments: