Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 28 March 2010

'एकेजीएसबी' बॅंकेचे थाटात उद्घाटन

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या पणजी शाखेचे आज (शनिवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील हॉटेल मनोशांती संकुलात दिमाखदार सोहळ्यात कवळे मठाधीश प. पू. शिवानंद सरस्वती स्वामी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी बॅंकेचे कार्यालय अत्यंत आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते. उद्घाटनाच्या या सोहळ्याला बॅंकेचे अध्यक्ष महेश अरस, संचालक मंडळ तथा बॅंकेचे ज्येष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. याप्रसंगी स्वीमीजींनी बॅंकेची भरभराट होवो असे आशीर्वचन दिले. तसेच अध्यक्ष व अधिकारी यांनीही आपले विचार मांडले. या बॅंकेच्या आगमानमुळे पणजीवासीयांची चांगली सोय होणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. सहकार क्षेत्रातील ही बॅंक अग्रणी म्हणून ओळखली जाते. या बॅंकेने आपल्या ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या वर्षाअखेरीचा अहवाल जाहीर केला असून त्यानुसार बॅंक एकूण व्यवसायाच्या तीन हजार कोटी अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे. एकूण उलाढाल २९२९ कोटी रुपये झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये १५.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ठेवींमध्ये १९ टक्के वाढ होऊन त्या १८४० कोटी रुपये झाल्या आहेत. सध्या बाजारातील मंदीच्या परिणामामुळे जोखमीचा विचार करून बॅंकेने सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे कर्जात सुमारे साडेनऊ टक्के एवढी माफक वाढ होऊन ती वर्षअखेरीस १०८९ कोटी रुपये झाली. तसेच बॅंकेचा करपूर्व ढोबळ नफा वाढू तो २६.९५ कोटींवरून वाढून ३७.३० कोटींवर पोहोचला आहे. एकूणच या बॅंकेने समाधानकारक अशीच प्रगती केल्याचे दिसून येते. आता गोव्यात या बॅंकेला आणखी विस्ताराच्या आणखी संधी उपलब्ध होणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. त्यामुळे बॅंकेचे पदाधिकारी आणि हितचिंतक यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments: