मुंबई, दि. १ - मुंबईत अजूनही पाच खतरनाक अतिरेकी लपले असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. याच माहितीच्याआधारे पोलिसांनी संपूर्ण महानगर पिंजून काढले असून अद्याप या अतिरेक्यांचा शोध न लागल्यामुळे चितेंचे वातावरण पसरल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
अतिरेकी ज्या "कुबेर' बोटीतून मुंबईत आले ती बोट मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या बोटीचे निरीक्षण केल्यानंतर त्या बोटीमध्ये १५ व्हिंटर जॅकेट, १५ टी शर्ट-पॅन्ट, १५ शेव्हिंग सामान, टूथ ब्रश, १५ चादरी व ब्लॅंकेट या सर्व वस्तू १५ च्या संख्येने सापडल्या.या वस्तूंवर "मेड इन पाकिस्तान' असे स्पष्ट शब्दांत छापले आहे. यावरुन मुंबईत एकूण १५ अतिरेकी आले असून ९ मारले गेले; तर एक पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आज मुंबईत ठिकठिकाणी "कॉंबिंग ऑपरेशन' करुन अतिसंवेदनशील भागात झडती घेतली. अनेक संशयितांची कसून चौकशीही केली. मुंबई "एटीएस' व क्राइम ब्रॅंंचचे अधिकारी या कॉंबिंग ऑपरेशनमध्ये गुंतले असून मुंबई पोलिसांनी आता खऱ्या अर्थाने या अतिरेकी हल्ल्याची गंभीर दखल घेतली असल्याचे समजते.दरम्यान अमेरिकेचे एफबीआय हे पोलिसांचे चौकशी पथक मुंबईत दाखल झाले असून एफबीआयचे अधिकारी या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करीत आहेत.
Tuesday, 2 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment