गोव्यातील मंत्र्याच्या खाणीसाठीचा माल
सावंतवाडी, दि. १४ (प्रतिनिधी)
सावंतवाडी - सिंधुदुर्ग पोलिसांनी आज सकाळी सावंतवाडी दोडामार्ग रस्त्यावरील सासोली घाटीत (ता. दोडामार्ग) स्ङ्गोटकांचा मोठा साठा पकडला. ही स्ङ्गोटके गोव्यातील एका मंत्र्याच्या खाणीसाठी पुरवली जाणार होती, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी राजकीय दबावाखाली पकडलेल्या संशयीतांची जबानी फिरवून ती वाळपईतील स्टोन क्रशरसाठी पुरविली जात होती, असे भासवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो (एम. एच. ०७ बी. ४२४२) जप्त केला असून यातील चालकासह दोघांना अटक केली आहे. या स्फोटक साठ्यात १५०० डिटोनेटर, जिलेटिनच्या प्रत्येकी ५०० किलोच्या १५ पिशव्या, अमोनिअम नायट्रेट आदी मालाचा समावेश आहे. अशा पद्धतीची स्ङ्गोटके नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रभाकर भागवत आणि दोडामार्गचे निरीक्षक अविनाश काळदाते यांना मिळाली होती. ते बरेच दिवस या स्फोटक वाहतूकीच्या मागावर होते. अशा पद्धतीचा साठा घेऊन टेम्पो निघाल्याची खबर मिळताच त्यांनी सोसोली घाटी येथे सापळा रचून ही कारवाई केली. साधारण एक तालुका बेचिराख होईल, इतक्या क्षमतेची ही स्ङ्गोटके असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यात अटक केलेल्यांमध्ये अनिल जगन्नाथ धोपेश्वर (५०) व प्रेमलाल धनाजी जाट (३७) या आकेरी ता. कुडाळ यांचा समावेश आहे. दरम्यान, ही स्फोटके पकडताच वाहनातील एका व्यक्तीकडून गोव्यातील एका मंत्र्यांच्या खाणीसाठी ती नेली जात असल्याचे कारण पुढे करून संशयीतांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला होता, अशीही खबर आहे. आता ही स्फोटके नक्की कुठल्या मंत्र्यांच्या खाणीवर नेली जात होती याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला असला तरी त्यात उत्तर गोव्यातील एका कॉंग्रेस नेत्याच्या नावाची चर्चा आहे, अशीही खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
Saturday, 15 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment