वास्को, कुडचडे , दि. ९ (प्रतिनिधी) ः कुडचडे येथे खनिजवाहू ट्रकने (क्र. जीडीझेड-५७४१) आज एका अज्ञात पादचार्याला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याला ओळखणे कठीण बनले. हा अपघात संध्याकाळी पावणेपाचच्या दरम्यान घडला. वास्को येथे आज दुपारच्या वेळी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणार्या बसने महम्मद राजासाब नायकोडे या ४५ वर्षीय कामगाराला धडक दिल्याने त्याचे निधन झाले.
आज दुपारी वास्कोच्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोर सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून बसचालक अजय तुकाराम नाईक याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक केली
आज दुपारी २.१५ च्या सुमारास सदर अपघात घडला. खासगी बस (क्रः जीए ०२ व्ही ४६६४) ने त्यास धडक दिल्याने महम्मद हा रस्त्यावर फेकला गेला. बस ची धडक बसून महम्मद गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेनेे त्वरित घटनास्थळावर दाखल होत त्यास उपचारासाठी चिखलीच्या कुटीर रुग्णालयात नेला. इस्पितळात आणण्यापूर्वीच महम्मद याचा मृत्यू झाल्याचे चिकित्सकांकडून घोषित करण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. डोक्याला गंभीर इजा झाल्यानेच त्याला मृत्यु आल्याचे वास्को पोलिस उपनिरीक्षक एफ.कॉस्ता यांनी सांगितले. बस चालक अजय तुकाराम नाईक याच्या विरुद्ध भा.द.स २७९ व ३०४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.
Monday, 10 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment