पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - पोलिस - ड्रग माफिया प्रकरणाचा तपास ठप्प झालेला आहे. त्यातच ड्रग विक्री करीत असलेल्या पोलिस अधिकार्याची आणि पोलिस शिपायाची नवी प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिली जावीत, अशी विनंती करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर झाली आहे. सदर याचिका उद्या सुनावणीला येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिस - ड्रग माफिया प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु, ती मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली होती. यातच उपनिरीक्षक सुनील गुडलर याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे आता न्यायालयातच या सर्व प्रकरणांचे भविष्य ठरणार आहे.
Friday, 14 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment