काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी)
आपल्या शक्तीचे विराट रूप दाखविल्यानंतरच आपले महत्त्व दुसर्याला कळते. आमदार रमेश तवडकर म्हणूनच खरोखर अभिनंदनास पात्र ठरतात. त्यांच्या प्रयत्नातून एक आदर्श काम झाले आहे. गोव्यातील नागरिक विविध कारणांनी वैतागले आहेत. १५ वर्षांपूर्वीची मानसिकता आज राहिलेली नाही. (५ रुपयांनी कांदा वाढला व सरकार गडगडले) आज याही स्थितीत आमोणा पैेंगीणीत आशेचा किरण दिसतो आहे. गोव्यातील लोकजीवन व इथल्या लोकसंस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष या आदर्श बलराम ग्रामात दिसेल, असे भावपूर्व विचार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. आमोणा पैंगीण येथे बलराम विकास संस्था व आदर्श युवा संघ आयोजित १० वा लोकोत्सव २०११ च्या समारोप सोहळ्यात आज रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर अध्यक्षस्थानी होते. आमदार रमेश तवडकर, आमदार महादेव नाईक, आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप, सत्कारमूर्ती स्थानिक नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, लोकगीत गायक सुलक्षा वेळीप, शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय गावकर, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, संघाचे अध्यक्ष मंगेश गावकर, सचिव जानू तवडकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
या सरकारला अधिवेशनाला सामोरे जावे लागते म्हणून प्रत्येक वेळी कामकाजाचे दिवस कमी - कमी केले जात आहेत. काणकोणात ही मायनिंगसाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र काम सुरू झालेले नाही. मायनिंगमुळे दक्षिण गोव्याला पाणी पुरवणारा सांगे खाणीमुळे त्रस्त आहे. असे प्रमुख पाहुणे पर्रीकर शेवटी म्हणाले.
संघाचे अध्यक्ष मंगेश गावकर यांनी स्वागत केले. आदर्श युवक संघाच्या वाटचालीची माहिती त्यांनी देतानाच काणकोण मागास भाग असला तरी आपल्या कामाने आपण त्याचा कायापालट घडवून आणणार आहोत, असा मनोदय व्यक्त केला.
संघाचे पदाधिकारी श्रीकांत तवडकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. वर्षा गावकर, कामिनी गावकर, सजल गावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सचिव जानू तवडकर यांनी अहवाल वाचन केले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अर्जुन गावकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष रत्नाकर यशवंत धुरी,
पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय गावकर, लोकगीत गायक सौ. सुलक्षा शा. वेळीप या सत्कारमूर्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच वनवासी कल्याण आश्रम पुणे - अध्यक्षांच्या यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप यांनी विचार व्यक्त केले. प्राचार्य वेलिंगकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. विविध स्पर्धांतील विजेत्यांना याप्रसंगी बक्षिसे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन तुकाराम वेळीप यांनी केले. आभार दया गावकर यांनी मानले.
Sunday, 9 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment