पणजी, दि. १० (प्रतिनिधी): संशयावरून पणजी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या क्रिपरेईन फर्नांडिस (३९) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पणजी पोलिस अडचणीत सापडले असून क्रिपरेईन याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेला नाही, असा दावा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी केला आहे.
७ जानेवारी रोजी पणजी पोलिसांनी फर्नांडिस याला पर्वरी येथील त्याच्या एका नातेवाइकाच्या घरातून ताब्यात घेतले होते. क्रिपरेईने आपल्याला चाकू घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पणजी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी रात्री १० वाजता ताब्यात घेतले होते. क्रिपरेईन याला अटक केल्याची माहिती दुसर्या दिवशी म्हणजे ८ जानेवारीला ३ वाजता त्याच्या चुलतभावाला देण्यात आली. त्याच्या काही तासानंतर म्हणजे रात्री ७ वाजता पुन्हा पोलिसांनी संपर्क साधून क्रिपरेईन याला ‘फिटस्’ आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर दि. ९ रोजी दूरध्वनी करून त्याचे निधन झाल्याचे कळवण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात उठ गोयकारा या संघटनेने काहीतरी काळेबेरे असल्याचा दावा केला आहे. मात्र आपण क्रिपरेईन याला मारहाण केली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला दारू पिण्याची सवय होती, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास पणजी पोलिस करीत आहेत.
Tuesday, 11 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment