मुंबई, दि. ९
माटुंग्यात रुईया कॉलेजसमोर रुस्तुमजी टॉवर येथे बांधकाम सुरू असताना सर्व्हिस लिफ्ट कोसळली. आज (रविवारी) सकाळी झालेल्या या दुर्घटनेत पाच मजूर ठार आणि एकजण जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व्हिस लिफ्ट २१ व्या मजल्यावरुन खाली येत होती. मात्र ११ व्या मजल्यावर शाफ्ट तुटल्याने लिफ्ट खाली कोसळून जमीनीवर आपटली.
जम्मू हायवे
अजून बंदच
जम्मू, दि. ९
प्रचंड हिमवर्षावामुळे आज सलग दुसर्या दिवशीही जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. जवाहर बोगदा आणि पतनीटॉप नजीक प्रचंड हिमवर्षाव सुरू आहे. त्यामुळे कालपासूनच येथे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक ठप्प झ्राल्याने सुमारे एक हजारावर वाहने अडकून आहेत. त्यामुळे लोकांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
धुक्यामुळे दिल्लीत
विमानसेवा ठप्प
नवी दिल्ली, दि. ९
दाट धुक्यामुळे आज राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा ठप्प झाली. एका विदेशी विमानासह सहा देशांतर्गत विमानांना इतरत्र वळवावे लागले. तसेच दोन उड्डाणे रद्द करावी लागली. बंगलोर आणि मुंबईची उड्डाणे रद्द करण्यात आली. न्यूयॉर्क, शिकागो आणि टोरॅन्टो येथे जाणार्या उड्डाणांचे वेळापत्रकही धुक्यामुळे बदलवावे लागले.
दिल्ली पोलिस
बनले सुसज्ज..
नवी दिल्ली, दि. ९
दिल्ली पोलिसांनी सरत्या वर्षात कोट्यवधींचे अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणांची खरेदी केली. राजधानीतील पोलिसांनी ५८६ अत्याधुनिक वाहने सुमारे ९.३२ कोटी रुपयांना खरेदी केली. सोबतच ग्लॉक पिस्तूल आणि स्निपर रायङ्गल्सचीही खरेदी केली. अत्याधुनिक वाहनांमध्ये बचाव कार्यासाठी, विशेष कारवाईसाठी, दंगल रोखण्यासाठी आदी प्रकारांचा समावेश आहे. हल्ले करणार्या अतिरेक्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरण असतात. त्या तुलनेत सुरक्षेसाठी तैनात पोलिसांजवळ कोणतेही सक्षम साधन नसते. ही बाब लक्षात घेऊन ही खरेदी करण्यात आल्याचे समजते.
Monday, 10 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment